भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला

dola phodoniyan kajal lyala | nam kapun shimaga khelala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥ वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥ मिथ्या बागुलाचा भेवो । बाळें सत्य मानिती पहाहो ॥३॥ ऐसें मिथ्या नको मनीं । एका जनार्दनीं ॥४॥