भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानराजें बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठानीं

dnyanarajen bodh kela | satyabala reda bolavila pratishthanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानराजें बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठानीं ॥१॥ भोजलिंग ज्याची समाधी आळंदीं । ज्ञानराज बोधी तिघांजणां ॥२॥ सत्यबळें बोध गैबीराया केला । स्वयें ब्रह्मा झाला सिद्धरुप ॥३॥ एका जनार्दनीं ऐसी परंपरा । दाविले निर्धारा करुनिया ॥४॥