भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदीपिका उजळी । नाहीं चितेंची काजळीं

dnyanadipika ujali | nahin chitenchi kajalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानदीपिका उजळी । नाहीं चितेंची काजळीं ॥१॥ ओवाळिला देवदत्त । प्रेमें आनंद भरित ।२॥ उष्ण चांदणें अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥ भेदाभेद मावळले । सर्व विकार गळाले ॥४॥ एका मिळाली जनार्दनीं । तेजीं मिळाला आपण ॥५॥