भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप

dnyanadev mhane bhajanen anavin | tanv tin dekhilin avaghin divyarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप ॥१॥ उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥ सकळ ते संत गोरियासी म्हणती । धन्य तुझी भक्ति त्रैलोक्यांत ॥३॥ एका जनार्दनीं पाक सिध्द जाहला । बैसलासे मेळा भोजनासी ॥४॥