भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव

dnyanadev guru dnyanadev tarun | utaril pail parun dnyanadev

रचनाकार: संत सेना · अभंग
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥ ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥ सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥