भजनी मालिका
← भजनांकडे परत

धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा

dhondyasi vyapar koni nahin kela | aj myan aikila vruttant tujha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥ उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥ गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥ एका जनार्दनीं ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥