भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष

dharma artha kam moksha | santacharanin thevi laksha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥ परा पश्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥ योगयागादि साधनें संतचरणीं असो ध्यानें ॥३॥ आणिक नको त्या उपाधी । तोडा देहीं आधिव्याधी ॥४॥ एका जनार्दनीं मन । एकपणें जनार्दन ॥५॥