भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य तुळशीचा महिमा । नाहीं आणीक उपमा

dhanya tulashicha mahima | nahin anik upama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य तुळशीचा महिमा । नाहीं आणीक उपमा ॥१॥ प्रात:काळीं दरुशन । घडतां पुण्य कोटीयज्ञ ॥२॥ नाम वदतां हे तुळशी । इच्छीलें पुरवीं मानसीं ॥३॥ तुळशी नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥