भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामीं नाचे

dhanya te bhagyache | vasudev namin nache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामीं नाचे ॥१॥ सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥ सदा नामीं ज्याचें मन । जन नोहे जनार्दन ॥३॥ नामें रंगे ज्याची वाणी । एका जनार्दनीं तोचि जनीं ॥४॥