भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे

dhanya te bhagyache | vas kariti pandhariche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥ करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥ पुंडलिकाची भेटी । वेणुनाद पाहती दृष्टी ॥३॥ करिती एकादशी । जाग्रण आनंदें मानसीं ॥४॥ तया पुण्या नाहीं लेखा । म्हणे जनार्दनीं एका ॥५॥