भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरीविण

dhanya may vyali sukrutachen phal | phal ten nirphal harivin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ तें निर्फळ हरीविण ॥१॥ वेदाचेंहि बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥२॥ योगायाग व्रत नेम धर्म दान । न लगे साधन जपतां हरी ॥३॥ साधनाचे सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यासिद्धि ॥४॥ नित्य मुक्त तोची एक ब्रह्माज्ञानी । एका जनार्दनें हरिबोला ॥५॥