भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली

dhanya jahalon atan | avaghi chinta varali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥ निवारला भाग शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥ भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहतां ॥४॥ समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥