भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी

dhanya godatir dhanya pratishthan | dhanya tethil jan rahivasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥ कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उध्दरी जगाचे कलिदोष ॥२॥ जयातीर्थी स्नान तत्पदी दर्शन । पूर्वज उध्दरण कुळासहित ॥३॥ निळा म्हणे जया धडो तेथील वारी । तया पुण्यासही न वर्णवे ॥४॥