भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला

dhanya divas jahal | santasamuday bhetala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य दिवस जाहल । संतसमुदाय भेटला ॥१॥ कोडें फिटलें जन्माचें । सार्थक जाहलें पैं साचें ॥२॥ आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥३॥ एका जनार्दनीं जाहला । धन्य तो दिवस भला ॥४॥