भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें

dhanya dhanya viththal dev | pahatan nirase bhev kalachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें ॥१॥ जाउनी घाला पायीं मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥ दरुशनें तारी जडजीव । निवारी भेव यमाचें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ध्यानीं मनीं विठ्ठल ॥४॥