भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर

dhanya dhanya ten sharir | jethen katha nirantar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥ गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥ स्वयें बोलिले जगज्जीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥ एका जनार्दनीं भले । हरिभक्तीनें उद्धरीले ॥४॥