भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन

dhanya dhanya te jan | jaya shivachen bhajan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥ हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥ हास्य विनोद कथा । तेणें मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥ एका जनार्दनीं जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥