भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां

dhanya dhanya shrihariche gun | nam pavan aikatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥ जें जें अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥ कीर्ति वर्णिता उद्धार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥ एका जनार्दनीं सोपें वर्म । गुण कर्म वर्णितां ॥४॥