भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत

dhanya dhanya shrigurubhakta | guruchen janati manogat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥ गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥ गुरुचेंनाम घेतां वाचें । कैवल्य मुक्ति तेथें नाचे ॥३॥ गुरुचें घेतां चरणातीर्थ । भुक्ति मुक्ति पवित्र होत ॥४॥ गुरुकृपेचें महिमान । शरण एका जनार्दन ॥५॥