भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य दिन। तुमचे झाले दरुषण

dhanya dhanya din| tumache jhale darushan

रचनाकार: संत सेना · अभंग
धन्य धन्य दिन। तुमचे झाले दरुषण ॥१॥ आजि भाग्य उदया आलें। तुमचें पाऊल देखिलें ॥२॥ पूर्व पुण्य फळा आलें। माझें माहेर भेटलें ॥३॥ सेना म्हणे झाला। धन्य दिवस आजि भला ॥४॥