भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते

dhanya bhagyache narinar | tulashi namaskar karati te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते ॥१॥ घेतां त्यांचे दरुदर्शन । नोहे पतन पूर्वजां ॥२॥ नाम जप अहर्निशीं । यम पळे भिउनी त्यांसी ॥३॥ ऐसा महिमा तुळशीचा । एका जनार्दनी साचा ॥४॥