भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया

dhanve pave dattaraja | maharaja gururaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥ तुजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा ॥३॥ महादोषी पतितालागीं । करा वेगी उद्धार ॥४॥ एका जनार्दनीं दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥