भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं

dhanve dhanve shrihari | nivarin sansar boharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांवे धांवे श्रीहरी । निवारीं संसार बोहरीं ॥१॥ आडलियाचा विसांवा । धांवे पावे तुं केशवा ॥२॥ तूं दीनदयाळ हरी । आपुले आम्हां जतन करी ॥३॥ अंकित भक्तांचा । ऐसी बोले वेदवाचा ॥४॥ एकाएकीं जनार्दनीं । आठ सहस्त्र बोले वाणी ॥५॥