भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवे देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोण्ही

dhanve deva tun nirvanin | tujavin nahin konhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांवे देवा तूं निर्वाणीं । तुजविण नाहीं कोण्ही ॥१॥ भुली पडली विषयसुखें । पात्र जालों महादु:खें ॥२॥ विसरलों हित । नेणें बुडालें स्वहित ॥३॥ एका जनार्दनीं । भुललासें नाहीं कोण्ही ॥४॥