भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला

dhanvanya dhanvatan na lava ushir | ha shreshthachar magen ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥ गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥ एका जनार्दनीं पतितपावन । हें तों तुम्हां वचन साजतसे ॥३॥