भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा

dhanv re dhanv atan | dinavatsala rama | sansarasang goshti | mi guntalon kama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥ तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥ विषय भोगितांना । देह पोसलें माझें । स्वाहित आठवेना । ध्यान चुकलों मी तुझें ॥३॥ विषया मिकलिलों । तुज शरण मी आलों । एका जनार्दनीं पायीं । लीन मी जाहलों ॥४॥