भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवावीण भक्तांचें संकट । कोणतें अरिष्ट निवारित

devavin bhaktanchen sankat | konaten arishta nivarit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवावीण भक्तांचें संकट । कोणतें अरिष्ट निवारित ॥१॥ कोणासी शरण जातें तेव्हां । कळिकाळ जेव्हां आकळूं येतां ॥२॥ संसार जेव्हां करितां ओढी । तडातोडी भंवतालीं ॥३॥ निळा म्हणे तें चुकविलें । अनर्थ वारिले कृपावंतें ॥४॥