भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा

devasi tushtanya ek yukti ahe | ramanam gay mukhin sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा ॥१॥ काया वाचा मनें संतासींशरण । तेणें नारायण तुष्ट होय ॥२॥ नामापरतें साधन आणीक नाहीं दुजें । एका जनार्दनीं निज नाम सार ॥३॥