भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये सदोदित

devasi to priy ek nam ahe | mhanoni tun gaye sadodit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये सदोदित ॥१॥ कला हें कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥ एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । मुक्ति सायुज्यता पाठीं लागे ॥३॥