भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी

devasi to bhav pure | tenen dev sada jhure | bhaktalagin sare | vaikunthasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥ भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजीं ॥२॥ भावे प्राप्ति होय देव । अभक्तसी संदेह । जवळी असोनी देव । नाहीं म्हणती ॥३॥ भावें देव घरीं नादे । एका जनार्दनीं आनंदें । म्हणोनि संतवृदें । तया न विसरती ॥४॥