भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो आवडे भक्त । नाहीं हेतु दूसरा

devasi to avade bhakta | nahin hetu dusara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो आवडे भक्त । नाहीं हेतु दूसरा ॥१॥ बळी सर्वस्व करी दान । त्याचें द्वारपाळपण केलें त्वां ॥२॥ धर्म सदा होय उदास । त्याचे घरी तुझा वास ॥३॥ तुझा भक्त अंबऋषी । त्याचे गर्भवास सोशिसी ॥४॥ तुम्हीं उदार जगदानीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥