भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे

devasi kanhin nesanen nase | jethen tethen dev ughadanchi dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥ न लाजे तेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥३॥ एका जनार्दनीं एकल्या काज । भक्ति तेणेंचि नेली लाज ॥४॥