भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी दुजे नावडे सर्वथा । करितां हरिकथा समाधान

devasi duje navade sarvatha | karitan harikatha samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी दुजे नावडे सर्वथा । करितां हरिकथा समाधान ॥१॥ येऊनिया नाचे कीर्तनीं सर्वदा । निवारी आपदा सर्व त्याची ॥२॥ भाविकांसाठी मोठा लोभापर । नाचतो निर्भर कीर्तनांत ॥३॥ एका जनार्दनीं आवडे कीर्तन । म्हणोनि वैकुंठसदन नावडेची ॥४॥