भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासाठीं घेउनी जोग । अवघचि भोग त्यजियला

devasathin gheuni jog | avaghachi bhog tyajiyala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देवासाठीं घेउनी जोग । अवघचि भोग त्यजियला ॥१॥ तेचि एक बळिये गाढे । कांपे त्यापुढें कळिकाळ ॥२॥ आशा मात्र नाहीं ज्यांसी । शांतिसुखासी लिगटले ॥३॥ निळा म्हणे हरीच्या ध्यानें । गेले विसरोन देहभाव ॥४॥