भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवांचें पूजन । घडतां रामस्मरण

devanchen pujan | ghadatan ramasmaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवांचें पूजन । घडतां रामस्मरण ॥१॥ हेचि एका पूजा सार । वायां कासया पसर ॥२॥ करुं बैसे देवपूजे । मनीं भाव आन दुजे ॥३॥ ऐसें पूजेचें लक्षण । सांगें एका जनार्दन ॥४॥