भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवांचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें

devanchen hen guj sakal mantramay | jen kan nijadhyey shankarachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवांचें हें गूज सकळ मंत्रमय । जें कां निजध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेविती सर्वभावें । रामरुप व्हावें निश्चयेंसीं ॥२॥ नष्ट अजामेळाचें पतितत्व गेलें । दिव्यरुप जालें वाल्मिकीचें ॥३॥ शरीर संपत्ती बळें अपूर्व सकळ । जाला द्वारपाळ एका जनार्दनीं ॥४॥