भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा

devache soire sant re janaven | yaparaten jiven nathavi kona

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरतें जीवें नाठवी कोणा ॥१॥ पडतां संकट आठवितसे संतां । त्याहुनी वारिता नाहीं दुजा ॥२॥ म्हणोनि घरटी फिरे तया गांवीं । सुदर्शनादि मिरवी आयुधें हातीं ॥३॥ लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनीं त्याचें वंदी पाय ॥४॥