भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे

dev viththal tirtha viththal | avagha viththal bharalase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥ भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥ एका जनार्दनीं मनीं विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥