भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे

dev tushte ekapanin | sahastrapani detuse

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे ॥१॥ पुरे एक तुळशीपान नाहीं आणीक कारण ॥२॥ जन्मजन्मांतरींची सेवा । फ़लद्रुप होय देवा ॥३॥ पूजनाचे भावें जाण । एकाजनार्दनीं तुष्टे आपण ॥४॥