भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव सुंदर घनसावळा । कासे सोनसळा नेसला

dev sundar ghanasavala | kase sonasala nesala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव सुंदर घनसावळा । कासे सोनसळा नेसला ॥१॥ चरणीं वाळे वाकी गजर । मुगुट कुडलें मनोहर ॥२॥ बाही बाहुवटे मकराकार । गळांशोभे वैजयंती हार ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । विटे शोभे समचरण ॥४॥