भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां

dev sarvathayin vase | pari na dise abhavikan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥ जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठें उरला ॥२॥ जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥