भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा

dev pahatan majamajin bhetala | sandeh phitala sarva majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥ माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुनें ॥२॥ एका जनार्दनीं पाहिलासे देव । फिटला संदेह आतां माझा ॥३॥