भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती

dev mhane namya vyapar barava kela | damasheti tula ragavati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥ वंदूनि श्रीविठ्ठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥ एका जनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥