भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी

dev mhane bhaktansi avadi | mi jahalon tumacha gadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी ॥१॥ सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥ भाव भुज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥३॥ आवडीनें देव बोले । भक्तांमाजीं स्वयें खेळे ॥४॥ खेळतां गोपाळीं । एका जनार्दनीं गोकुळीं ॥५॥