भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया

dev jala nama nama jala dev gonaicha bhav pahavaya

रचनाकार: संत गोणाई · अभंग
देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया ॥१॥ हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ||२|| हातीं धरोनियां घेऊनी चालिली फिरून पाहतीजाली तो देव ॥३॥ अगा माझ्या बापा तूं कोणा हवासी मजदुर्बळासी काय होय ॥४॥ सोहळा सहस्र मुख्य अष्ट तुझ्या कांता । त्या माझिया पाता प्रवर्तती ॥५॥ पुंडलिकासी तुवा दिली आहे भाका गोणाई म्हणे तक बहु होसी ॥६॥