भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी

dev guj sange bhaktan | ankit ankita tumacha mi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥ तुम्हालागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥ तुम्हां न यावें उणेपण । माझें थोरपण कोण वानी ॥३॥ म्हणोनि गळां घालीं मिठी । एका जनार्दनीं पडली गांठी ॥४॥