भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला

dev ghara ala | bhaktin sanmanen pujila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥ पाहुणेर पंगती । संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥ पुढें आरंभूनी कथा । बुका माळा गंधाक्षता ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हानंदें । नाचती उभयतां आनंदें ॥४॥