भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे

dev dehin ahe sarva te mhanati | janatiya na kale gati dev nene

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥ ऐसें ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करुनी कष्ट ॥२॥ देवाची ती भेटी नाहीं जाहली तया । शिणताती वायां कर्महीन ॥३॥ एका जनार्दनीं जवळी असोनी देव । कल्पनेंन वाव केला मनें ॥४॥