भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा

dev dagadacha bhakta to menacha | eka dohincha vichar kaisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥ खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥