भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी

dev bhulala bhavasi | sandoniyan vaikunthasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥ उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥ पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥ उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥